Select Page

Prelims Previous Year Result Analysis

मागच्या काही वर्षातील पूर्व परीक्षेच्या निकालांचे विश्लेषण :

MPSC पूर्वपरीक्षे मध्ये,त्या वर्षी उपलब्ध रिक्तपदांच्या संख्ये बदल्यात किती विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जातात याची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळेल . यावरून विद्यार्थ्यांना अंदाज घेता येईल कि दरवर्षी साधारण ३ लाख मुले पूर्व परीक्षेसाठी अर्ज करतात त्यातील किती जणांची निवड केली जाते आणि किती गुण त्यासाठी घेणे गरजेचे आहे . मुख्य परीक्षेच्या ऐवजी पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जास्त स्पर्धा करावी लागत असल्याचे चित्र तुम्हाला दिसेल . CSAT यापेपरमुळे ENGINEER DOCTOR असलेले विद्यार्थी ज्यांचा पहिल्या पेपर चा एवढा अभ्यास नसतो ते पुर्वपरीक्षेमध्ये चांगला स्कोर करून मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात , पुढे मुख्य परीक्षेमध्ये बरेचदात्यांनामूळ विषयांचा अभ्यास नसल्यामुळे यश मिळत नाही पण पूर्व परीक्षेमध्ये इतर  विद्यार्थ्यांना ज्यांच APTITUTE, MATH, ENGLISH COMPREHENSSION कमकुवत आहे अशांना त्यांचा फटका बसू शकतो. आणि यामुळेच मुख्य परीक्षेपेक्षा पूर्व परीक्षा दर वर्षी अवघड बनत असल्याचे दिसत आहे . पुढील तक्त्या वरून तुम्हाला काही अंदाज कळेलच.

वरील तक्त्या वरून विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि २०१४ ला ६३९५ मुले पूर्व परीक्षा पास झाले पण त्यातील १३६७ मुले मुख्य परीक्षा पास झाले होते आणि त्यातील १८३ विद्यार्थी अधिकारी बनले ,म्हणजे उरलेले ५०२८ जे एक पूर्वपरीक्षा पास आहेत आणी ११८४ विद्यार्थी ज्यांनी एकदा मुलाखत दिलेली आहे हे सर्व विद्यार्थी पुढच्या वर्षी २०१५ ला येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये तुमचे स्पर्धक असणार आहेत. २०१५ च्या निकालावरून असे दिसते कि एकदा पूर्व परीक्षा पास झालेले काही विद्यार्थ्यांना देखील २०१५ च्या पूर्वपरीक्षे मध्ये अपयश पहाव लागलेले आहे .

एकदा दोनदा पूर्वपरीक्षा पास झालेले तसेच मुलाखत दिलेल्या बऱ्याच मुलांसोबत  तुम्हाला पुर्वपरीक्षे मध्ये स्पर्धा करावी लागणारे त्यामुळेच  पूर्वपरीक्षा पास होणे जास्त कठीण वाटते . आणि म्हणूनच आम्ही सांगतो कि MPSC करायला पुण्यात येणारे आणि महागडे class केलेले ९८% विद्यार्थी हे २/३ वर्ष प्रयत्न करूनही एकवेळची पूर्वपरीक्षा देखील पास होऊ शकत नाहीत . त्यामुळे पुणे मुंबई जायचा नाद सोडा ,आहात तिथे राहून अभ्यास करा आणि प्रेलीम्स पास करुन् पहा. पूर्व आणि मुख्य परीक्षे मध्ये ४/५ महिने अवधी असतो त्यात फक्त मुख्य परीक्षेच्या विषयांचा अभ्यास आणि पूर्व मुख्य मधल्या समान असलेल्या विषयांची उजळणी  RIVISION आरामात होते.प्रिलिम्स पास होण्यासाठीलागणारे कष्ट, तेवढा अभ्यास तुम्ही करू शकलात तरच पुढे मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्ही करू शकाल अन्यथा नाही हे डोक्यात ठेवा नेहमी करता.उगीच हवेतील स्वप्ने आणि पोकळ आत्मविश्वास बाळगून पुण्याची वाट धरू नका . इथेकिती कष्ट लागतात काय कराव लागत नेमकं ते जाणून घ्या मग पुढे जा .

MPSC च्या सांगण्यानुसार मुख्यपरीक्षेसाठी एका जागेसाठी १२ ते १५ पट विद्यार्थी पूर्वपरीक्षेमधून निवडले जातील . २०१६ पासून तरी हे तत्व पुरेपूर लागू होईल असे वाटत आहे .